सातारा येथे संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने दि.२५ रोजी गौरव समारंभ 

0

अनिल वीर सातारा : उत्कृष्ट जिल्हाधिकारी तथा सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने व सातारा विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या हस्ते शहरातील शाळां – महाविद्यालयांतील इ. १०वी व इ. १२वीतील सर्व प्रवर्गातील सुमारे शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवार दि.२५ रोजी सकाळी ११ वा. नगरवाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये होणार आहे,अशी माहिती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.

                       

विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील उज्वल वाटचालीसाठी  करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी संबोधी प्रतिष्ठानचेवतीने गेले बारा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यावर्षी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना  शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची विज्ञान विषयक पुस्तके  व  भारतीय संविधानाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.तेव्हा समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here