१४ गावांचे स्वातंत्र्य घोषित करून पैठण तालुक्याने उभारला मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा

0

 स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकार इनायतुल्लाला घातल्या होत्या गोळ्या

पैठण(प्रतिनिधी) : मराठवाडा मुक्तिसंग्रामात पैठण तालुक्यातील  अनेक युवकांनी मराठवाडा रजाकाराचा जुलमी राजवटीपासून स्वतंञ मिळवण्यासाठी  बलिदान दिले. त्यांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथाजाम आजही मराडवाड्यात  सांगितल्या जात आहे. गोदावरी नदी पलीकडील १४ खेड्यांना स्वतंत्र घोषित करून पैठणकरांनी निजामाविरोधात उभारलेला सशस्त्र लढा आजही प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यसैनिक भाऊराव कानडे यांची रझाकारांनी निघृण हत्या करून शिर तलवारीच्या टोकावर ठेवून पैठणमध्ये मिरवणूक काढली होती. त्याचा बदला म्हणून स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकार इनायतुल्लाला गोळ्या घातल्याने या लढ्याची तीव्रता लक्षात येते

निजामाविरोधात लढा सुरू झाल्यानंतर पैठण शहर व तालुक्यातील हुतात्मा भाऊराव कानडे, काशीनाथराव कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, दिगंबरराव कावसनकर, त्र्यंबकदास पटेल, तात्याराव महाजन, अण्णासाहेब गव्हाणे, बाबूराव गव्हाणे, सुमेरसिंग करकोटक, राधाबाई पोहेकर, सालारभाई शेख, काशीनाथ बोंबले, लेंभे, चोथमल आदींनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात झोकून घेतले होते. या स्वातंत्र्यसैनिकांनी- गोदावरी नदीच्या पलीकडे असलेल्या चांगतपुरी, तांदुळवाडी, तेलवाडी, कावसान आदी १४ गावे निजाम राजवटीतून ‘स्वतंत्र’ झाल्याची घोषणा केली. चांगतपुरी येथील देशभक्त तरुण भाऊराव कानडे यांनी या लढ्यात सेनापतीची भूमिका निभावली होती. पैठण तालुक्याच्या शेजारच्या शेवगाव तालुक्यातील (जि. अहमदनगर) एरंडगाव व कन्हे-टाकळी या दोन्ही गावांमध्ये शिबिरे स्थापन करून युवकांना सशस्त्र प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. याची भणक लागताच रझाकार सैनिकांनी पैठण परिसरात हैदोस घातला. यावेळी महिला व बालकांना निजामाच्या हद्दीबाहेर नेऊन सोडावे लागले होते. यातून निजामाविरोधात असंतोष निर्माण होऊन मोठ्या संख्येने तरुण मुक्तिसंग्राम लढ्यात सहभागी झाले. शिबिरातून प्रशिक्षित क्रांतिकारकांनी निजाम राजवटीच्या पटवाऱ्यांची दफ्तरे जाळणे, नाक्यांवर हल्ले करणे, बॉम्बने पूल उडवणे, निजामाच्या शस्त्राची लूट करणे अशा कारवाया सुरू करुन निजाम सैनिकांना हैराण केले. याचदरम्यान निजामाच्या प्रधानाचा पैठण दौरा घोषित झाला; परंतुपैठण येथील निजामाच्या कार्यालयावर स्वातंत्र्य सैनिकांनी बॉम्बहल्ले केल्याने प्रधानास पैठण दौरा ऐनवेळी रद्द करावा लागला होता. पोलिस अॅक्शननंतर क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य घोषित केलेली ही चौदा गावे भारतात सामील झाली. यानंतर भाऊराव कानडे यांची जपून ठेवलेली रक्षा स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या हस्ते पैठणच्या गोदावरीत विसर्जित करण्यात आली.

स्वातंत्र्यसेनानी कै. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या ‘अग्निशिखा’ या पुस्तकात पैठणच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या यशोगाथांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. या योद्ध्यांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी इतिहास अभ्यासकांनी केली आहे.

………………………

भाऊराव कानडे यांच्या हत्येचा घेतला बदला.

पैठण येथील सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक भाऊराव कानडे यांची निजामाच्या सैनिकांनी हत्या केली.या हत्या प्रकरणाचा बदला म्हणून स्वातंत्र्य सैनिकांनी इनायतुल्लाचा ठावठिकाणा शोधून त्याच्यावर हल्ला चढविला. त्याला जिवत पकडून पैठणला आणले. स्वातंत्र्य सैनिक काशीनाथराव कुलकर्णी यांनी नंतर इनायतुल्लावर गोळ्या झाडून त्याला ठार मारले व कानडे यांचा बदला घेतला*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here