सातारा/अनिल वीर : गुलामगिरीतून मुक्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिल्याने खऱ्या अर्थाने क्रांतीचा सूर्य उगवला.असे प्रतिपादन सिने अभिनेते किरण माने यांनी केले.
भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन अभियान’ अर्थात ‘बी एस फोर राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत – येथील अजिंक्य पतसंस्थेच्या विद्याभवन येथे जिल्हा क्लस्टर अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या हस्ते संपन्न झाले. तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”संविधानापूर्वी देशात अराजकता होती.ब्रिटिश राजवट,फाळणी,शाही पद्धत वैगरे होती. लोकशाहीच्या झोपडीपुढे भिम गेला.नि,विस्तृत संविधान दिले.त्यामुळेच बुद्ध हसला.संविधान दिले त्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेब यांनी दूरदृष्टीने केलेले भाषण आज खरे वाटत आहे.तेव्हा मूल्यांची पायदळी तुडवणाऱ्यापासुन आपले संविधान आपणच वाचविण्यास पुढे आले पाहिजे.”
गेली सहा वर्षे देशात बी एस फोर अभियान सुरू असून यावर्षी देशातील शेकडो जिल्ह्यात क्लस्टर अधिवेशने सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून हे अधिवेशन संपन्न झाले. यावेळी अंनिस, संभाजी ब्रिगेड, ओबीसी संघटना, शिक्षक संघ, समिति , प्राचार्य संघटना, बौद्ध महासभा, बीएसएनएल, कास्ट्राईब, ईबटा आदी सुमारे पंचवीस संविधानवादी सामाजिक संघटना सहभागी झालेल्या होत्या. हा पूर्णतः सामाजिक कार्यक्रम आहे.
सदरच्या कार्यक्रमास प्रा.डॉ.श्यामसुंदर मिरजकर,भरत लोकरे,संतोष शिंदे,प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे,प्रकाश खटावकर,एम. बी भोकरे आदीनी व्यक्त केले. संविधानाचे अभ्यासक डॉ. विनोद पवार हे पहिल्या सत्राचे व एम.डी.चंदनशिवे हे दुसऱ्या सत्राचे अध्यक्षता मनोगत व्यक्त केली. ध्वजारोहणाने सुरू झालेल्या दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनात भारतीय संविधान जागृती, अंमलबजावणी, सुरक्षा,संवर्धन, सामाजिक अभिसरण आदी विषयावर चर्चा व संवाद झाला.या अधिवेशनास जिल्ह्यातील मान्यवर,पत्रकार व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. क्लस्टर समन्वयक सुशांत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. हणमंत सकलावे यांनी सूत्रसंचालन केले.