सातारा : भारतीय बौद्ध महासभेतर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धम्मचक्रप्रवर्तन दिन दि.१२ ऑक्टोबर रोजी मोठ्या उपक्रमाने साजरा करण्यासंबंधी महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे होते. दि.२७ रोजी सकाळी धम्म सहल आगाशिवनगर लेणी तदनंतर दुपारी महाविहार येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.दि.६ ऑक्टोम्बर रोजी समता सैनिक दल प्रशिक्षण व दि.१० पासून श्रामनेर शिबीर असे धम्मचक्र दिनापर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर,एकनाथ तेलतुंबडे, ऍड. विलास वहागावकर,पदाधिकारी,सदस्य,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे,विविध संघटनांचे प्रतिनिधी,कार्यकर्ते, सम्यकचे सचिव बी.एल.माने, जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे,माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, केंद्रीय शिक्षक भागवत भोसले, नंदकुमार काळे,कुमार सुर्वे, प्रसाद गायकवाड, तालुका पदाधिकारी, सर्व आजी-माजी पदाधिकारी,बौध्दाचार्य,श्रामणेर, केंद्रीय शिक्षक,उपासक व उपासिका उपस्थीत होत्या.