माळशिरस : भारतीय जनता युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभागाचे जिल्हा पिलीव गावचे युवा नेते, निरा देवधर उर्वरित गावांचे संघर्ष समिती अध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होईल, असा परफेक्ट अंदाज युवा मोर्चाच्या गोटामध्ये व्यक्त केलेला होता.
नूतन जिल्हाध्यक्ष शिवराज भैय्या पुकळे व भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुका सरचिटणीस स्वप्निलकुमार राऊत यांनी कपड्यांसाठी व लग्न सण समारंभ यांच्यासाठी सुप्रसिद्ध असणारे मांडवे सदाशिवनगर सरहद्दीवरील पुणे-पंढरपूर महामार्गावर असणारे मुक्ताई कलेक्शन येथे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवराज भैय्या पुकळे, माळशिरस तालुका सरचिटणीस स्वप्निलकुमार राऊत, दुकानचे मालक सुभाष पालवे पाटील उपस्थित होते.