नायलॉन मांजामुळेपोलिस अधिकाऱ्याचा गळा चिरला

0

छत्रपती संभाजीनगर , 14 जानेवारी  : संक्रातीला होणाऱ्या पंतगोत्सवाचा जबदस्त फटा चक्क पोलिस अधिकाऱ्यांला बसल्याची घटना आज, मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात घडली. शहरातील सुधाकरनगर- सातारा परिसरात पोलिस उपनिरीक्षकाचा गळा मांजाने चिरल्या गेला.
दीपक पारधे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर छ. संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपाचर सुरू आहेत.
           

यासंदर्भातीलमाहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक दीपक पारधे हे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. ते नित्यनेमानुसार आज, मंगळवारी सकाळी दुचाकीने पोलिस ठाण्यात चालले होते. शहराच्या सातारा परिसरातील सुधाकर नगर भागात त्यांच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला. मांजामुळे गळा चिरला जाऊन मोठा रक्तस्राव झाला. त्यानंतर पारधे बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सातारा ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली. पोलिस सध्या घटनास्थळी गेले असून नायलॉन मांजा लावून पतंग उडविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड आणि अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन पारधेंच्या प्रकृतीची माहिती घेतली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here