फुलंब्री प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांना जमा-खर्चाचा हिशोब अचूक करता यावा आणि त्यांच्या व्यवहारज्ञानाचे दृढीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे बाल आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम गट शिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर,केंद्र प्रमुख सदाशिव बडक,सरपंच आशा दत्तात्रय कापडे, उपसरपंच वामनराव ताठे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश ताठे,उपाध्यक्ष शीतल लहाने या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले प्रतिमेला पुष्प अर्पण करून दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
या आनंदनगरी मध्ये सहभागी ७३ विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले होते. रसरशीत गुलाब जामुन,स्वादिष्ट सोनपापडी, चटकदार भजे, चविष्ट समोसा,स्वादिष्ट भेळ,लुसलुशीत वडापाव,तळलेला ब्रेडवडा,आरोग्यदायी शेंगदाणा लाडू,झणझणीत बाजरी भाकर-भरीत,चवदार मसाला डोसा,लज्जतदार चहा यासह विविध फळे,शेतातील ताजा भाजीपाला विद्यार्थ्यांनी विक्रीस ठेवला होता.या सोबतच विविध मनोरंजक खेळांचे स्टॉल लावलेले होते.
गावातील महिला-पुरुष,युवक-युवती, आबाल-वृद्धांनी या आनंदनगरीचा मनसोक्त आनंद घेतला.विविध मनोरंजक खेळातही सहभागी झाले.या आनंदनगरी मध्ये बरीच आर्थिक उलाढाल झाली असून यामुळे विद्यार्थ्यांना जमा-खर्चाचा हिशोब अचूकतेने करता येवू लागला.या आनंदनगरीच्या यशस्वितेसाठी मंगल वेळे,सांडू शेळके,मंगला पाटील,विलास चव्हाण,संगीता वाढोणकर,उज्वलकुमार म्हस्के,उमेश मुळे,नितीन शेळके, स्वप्निल पाटील,रूपाली घुगे,उमेश कापडे,वर्षा कापडे यांनी परिश्रम घेतले.