पैठण(प्रतिनिधी):पैठण तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, मुधलवाडी येथे ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा उद्घाटन सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रिस्टल कंपनी मार्फत शाळेला नवीन बेंचेस भेट देण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरयांचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. तसेच क्रिस्टल कंपनीचे संचालक निशांत अग्रवाल यांच्या हस्ते शाळेला नवीन बेंचेस प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश,मुधलवाडीच्या सरपंच श्रीमती. मनिषाताई मुकुटमल , उप सरपंच पोपट ढाकणे, सदस्य सुशील बोडखे, कैलास मदन सोनु पोकळे, शिवाजी जाधव विक्रम आढाव, सुरेश शिंदे, रघुनाथ डाके , लेखाधिकारी श्रीमती अन्वेकर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव , ग्रामपंचायत अधिकारी राधाकृष्ण चौधरी , ग्रामपंचायत सदस्य सतीश लबडे, लाला कुरेशी , काकाभाऊ बर्वे, भरत मुकुटमल, दिपक गव्हाणे , पत्रकार लाला जाधव , क्रिस्टल कंपनीचे व्यवस्थापक आबासाहेब गिरगे, मुख्याध्यापक आबासाहेब कणसे सर व शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुळे सर यांनी केले , ग्रामपंचायत अधिकारी राधाकृष्ण चौधरी यांनी प्रास्ताविक केले , शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब कणसे यांनी सर्वांचे आभार मानले.