फुलंब्री प्रतिनिधी :- नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वाकोद ता-फुलंब्री येथे अभिवादन सभा घेण्यात आली.
या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल वेळे मॅडम या होत्या.सर्वप्रथम अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी यश ताठे या विद्यार्थ्यांने सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर भाषण दिले. या शाळेतील सहशिक्षक उज्वलकुमार म्हस्के यांनी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वावर उपस्थितांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.या प्रसंगी शाळेतील सहशिक्षिका मंगला पाटील,विलास चव्हाण,उमेश मुळे,नितीन शेळके,स्वप्नील पाटील,रूपाली घुगे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन सांडू शेळके यांनी तर आभार प्रदर्शन संगीता वाढोणकर यांनी केले.