अनिल वीर सातारा : बहुजनांच्या शिक्षणासाठी रयत व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था काम करीत आहेत.यापुढे जर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकत्रीत काम केले तर शिक्षणास नवी दिशा मिळेल.असे प्रतिपादन श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव (प्रशासन व अर्थ), शिवाजी विद्यापीठाचे सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य,जिल्हा प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ असोसिएशनचे सेक्रेटरी व येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे ४० वर्षांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.त्या त्यानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सेवागौरव व गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्राचार्य शेजवळ यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा अध्यक्षस्थानावरून प्राचार्य अभयकुमार साळुंखे मार्गदर्शन करीत होते.यावेळी शिक्षक आ. जयंत आसगावकर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डी. के. मस्के,प्राचार्य मेणकुदळे,राजमाने,डॉ. संभाजीराव पाटणे ,ऍड.पवार (बहुले),संदीप शिंदे,उदयनसिंह उंडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले,”शिक्षणमहर्षी बापूजी यांनी कर्मवीर अण्णा यांच्या साहाय्याने संत गाडगेबाबा यांना एक लाखाची थैली दिली होती. यापुढे संस्थेतर्फे आजीव सेवक यांची नेमणूक करणे अवघड आहे.सद्यस्थितीत त्याग नको.भोग हवा.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यासाठी पहिल्या टप्प्यात परीक्षा घेतल्यानंतर आजीव सेवकांचा विचार केला जाईल.सर्वस्व समर्पण संस्थेसाठी त्यागी वृत्तीने शेजवळसर यांनी काम केले असून ते अखेरपर्यंत काम करतील.”ना.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले,”मंत्री झालो असलो तरी सातारचाच आपला माणुस कायम राहणार आहे.प्राचार्य शेजवळ यांनी चांगले काम केल्याने संस्थेसाठीही अविरत कार्यरत राहतील.त्यांच्या अनुभवाचा लाभ यापुढे सर्वांना मिळत राहील.”
यावेळी प्राचार्य शेजवळ, आ.जयंत आसगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची विस्तृत अशी भाषणे केली.सुमारे ३ तास कार्यक्रम सुरू होता.शेवटी अनेकांनी सौ.व श्री प्राचार्य शेजवळ यांचा सत्कार करण्यात आला.
उपप्राचार्य डॉ.तवस यांनी प्रास्ताविक केले.यावेळी ‘राजस’ सेवा गौरव ग्रंथ, डॉ. राजेंद्र शेजवळ लिखित ‘राजदीप’ लेखसंग्रह व ‘राजदौलत’ कविता संग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.त्यामुळे समारंभ ज्ञानप्रेमी व साहित्य रसिकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.सदरच्या कार्यक्रमास शैक्षणिक,सामाजिक,पत्रकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, पालक, माजी विद्यार्थी,नागरिक, प्राध्यापक-प्राध्यापिका व अध्ययनार्थी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.याकामी,संयोजन समितीने अथक असे परिश्रम घेतले.