विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रायगड जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न 

0

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )प्रजासत्ताक दिन अर्थातच २६ जानेवारीचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडां क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुल, उरण, स्विमिंग पूल, विमला तलाव शेजारी उरण शहर, जिल्हा रायगड येथे भव्य दिव्य असे रायगड जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस मॉर्निंग वॉक ग्रुपचे जेएनपीटीचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर स्पर्धेचे उदघाटन आमदार महेश बालदी, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले.विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,ब्लू स्टार सेक्युरिटीचे डायरेक्टर विकास भोईर यांनी सर्वांचे स्वागत केले.

या जिल्हा स्तरीय स्पर्धेत एकूण १५० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. इंटर नॅशनल कोच किशोर केशव पाटिल,नॅशनल कोच हितेश जगन्नाथ भोईर, नॅशनल स्विमर संकेत केशव म्हात्रे,सचिन सिंगरूत,समर्थ नाईक, अभिनंदन डालवी यांनी सदर स्पर्धेचे पंच म्हणून काम केले.यावेळी स्विमिंग पुलचे मॅनेजर श्रीकांत जाधव, मदन कटेकर, रुपम पाटील, दिपक घरत, विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्विमिंग (जलतरण )क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मयंक दिनेश म्हात्रे, मोहित संदीप म्हात्रे, आर्य किशोर पाटील, संकेत केशव म्हात्रे, ओमकार सदानंद कोळी, राष्ट्रीय प्रशिक्षक (कोच )-हितेश भोईर, आंतरराष्ट्रीय कोच (प्रशिक्षक )- किशोर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या रायगड जिल्हा स्तरीय स्पर्धेला रसिक प्रेषक खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. खेळाडूंना, स्पर्धेकांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे, खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळावा, व्यासपीठाच्या माध्यमातून खेळाडू हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे, खेळाडूंना मान सन्मान मिळावा, खेळाडूंचे नाव लौकिक व्हावे या दृष्टीकोणातून दरवर्षी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही अशा प्रकारचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खेळाडू, स्पर्धक, रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here