पंकज कदम,पुसेगाव प्रतिनिधी : विसापूर तालुका खटाव येथे कै. चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटाव यांच्या शाखेतील श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूरयेथे सन 2023 व 20204 या वर्षातील पाचवी ते दहावी पर्यंत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीनींना व आदर्श विद्यार्थी म्हणून एका विद्यार्थ्याला विसापूर व बाहेरील मान्यवर यांच्या वतीने शुभेच्छा व प्रोत्साहन म्हणून आर्थिक व वस्तू स्वरूपात देणाऱ्या दात्याकडून व गावातील मान्यवर मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ पार पडला त्यामध्ये गावातील उपस्थित मान्यवर खालीलप्रमाणे.
युवा नेते हरिश्चंद्र सावंत (चाचा ),माजी उपसरपंच बाळासाहेब सावंत,माजी चेअरमन नवनाथ साळुंखे (नाना ),माजी सैनिक कविराज शिंदे (उपाध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना विसापूर ) ,श्री बाळासाहेब कदम (सेवानिवृत्त अधिकारी सा. बा. विभाग ),श्री प्रविण मधुकर कुलकर्णी (माजी सैनिक) भरत नाना साळुंखे (काका ),आबासाहेब साळुंखे (ऍम्ब्युलन्स ड्राइवर ) प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव.सचिन ढोले, गणेश उर्फ आबासाहेब सावंत (शेतकरी ) प्रदीप जगताप. भोसरे गावचे सुपुत्र कु. विशाल आबासो जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महसूल अधिकारी म्हणून निवड झालेबद्दल मान्यवर व शाळेमार्फत शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
स्वागत मुख्याध्यापक गायकवाड सर, निवेदन श्री प्रभावळे सर, सत्कार निवेदन सौं सीमा जाधव, व प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्याना मार्गदर्शन श्री प्रविण कुलकर्णी माजी सैनिक विसापूर व कु विशाल आबासो जाधव भोसरे यांनी केले व आभार मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी मानले. या कार्यक्रमाला विसापूर परिसरातील ग्रामस्थ महिला हजर होत्या