शिवाजी बैक ते सा बां उपविभाग कार्यालय पर्यंत सिमेंट रस्ता होणार गुळगुळीत

0

नागरीकांत समाधान व्यक्त

पैठण(प्रतिनिधी):पैठण शहर हे धार्मिक ऐतिहासिक व पर्यटकस्थळ असल्याने पैठण शहरातील रस्ते सध्या चांगले होत असून त्याचेच एक उदाहरण म्हणून शहाजहापुरा ते सार्वजनिक बांधकाम विभाग पैठण या रस्त्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून सदरील रस्ता हा चांगल्याप्रकारे व दर्जेदार होत असल्याने नागरीकांनी सांगितले.bपैठण शहरातील शिवाजी नागरी बैक ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय पैठण पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम चालू असून हा रस्ता झाल्यावर नाथ मंदीर परीसराकडे जाण्यासाठी चांगले होणार आहे.

 

 नगरविकास योजनेअंतर्गत २७५ मीटर व आठ मीटर रूंदीचा सिमेंट काॅक्रीट रस्ता खोदाई करुन खडीकरण,लिन काॅक्रीट आणि त्यावर कठीण काॅक्रीट टाकून रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून तो लवकरच नागरीकांसाठी खुला होणार आहे या रस्त्यावर कोर्ट कडून येणारी वाहतूक वर्दळ थेट आपल्या गरजेनुसार नाथ मंदीर कडे जाणार असल्याने भाविकांसह नागरीका कडून समाधान व्यक्त केले जात आहे सदरील काॅक्रीट रस्त्याचे काम माऊली कंस्ट्रक्शनचे संतोष डिडोरे व नितीन देशमुख करीत आहे.

याबाबत कंत्राटदार नितीन देशमुख यांनी सांगितले की शिवाजी नागरी बैक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता अतिशय खराब होता परंतु सध्या होत असलेल्या रस्ता पूर्ण झाल्यावर नागरीकांना येणे जाणे सोईस्कर होईल. तर शाखा अभियंता लक्ष्मण तनपुरे पाटील यांनी सांगितले की  रस्त्याचे खोदकाम करून खडिकरण ,लिन काॅक्रीट व सध्यस्थितीत पीक्युसी (कठीण काॅक्रीट)काम सुरू आहे तर येथील नागरीक अय्युब शेख,नय्युम धांडे म्हणाले की पैठण शहरातील शहाजहापुरा ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणारा हा रस्ता फार खराब झालेला होता या रस्त्यावरून साधे चालणेही अवघड बनले होते परंतु आता नव्याने होत असलेल्या दर्जेदार रस्त्यामुळे नागरीकांचे थांबणार असून रस्ता नागरीकासाठी खुला होईल.

    पैठणचे आमदार विलास बापू भुमरे पाटील यांच्या प्रयत्नातून पैठण शहरासह तालुक्यात  विकास होत आहे.

——–

प्रतिक्रिया 

 नितीन देशमुख(कंत्राटदार ) : यांनी सांगितले की शिवाजी नागरी बैक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता अतिशय खराब होता परंतु सध्या होत असलेल्या रस्ता पूर्ण झाल्यावर नागरीकांना येणे जाणे सोईस्कर होईल.

——

लक्ष्मण तनपुरे पाटील:(शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पैठण) : यांनी सांगितले की  रस्त्याचे खोदकाम करून खडिकरण ,लिन काॅक्रीट व सध्यस्थितीत पीक्युसी (कठीण काॅक्रीट)काम सुरू असून ते आम्ही स्वाता : उभाराहून दर्जेदार बनवून घेत आहे.

——-

संजय गुळवे(नागरिक) : शिवाजी नागरी बैक ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणा-या रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झालेला होता त्यामुळे नागरीकासह दुचाकी, चारचाकी वाहन धारकांना यांचा त्रास होत होता मात्र सध्या होत असलेल्या दर्जेदार रस्त्यामुळे नागरीकांना येण्या जाण्यासाठी आता हा रस्ता सोईस्कर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here