अंधश्रद्धा न बाळगता मेळ असावा !
सातारा : गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला…..म्हणत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र भजन-कीर्तनातून अभिवादन करण्यात आले. येथील श्री संत गाडगे महाराज समाज सेवा संस्थेचे सांस्कृतिक भवन,मठ (कामाठीपुरा) येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शामराव सोनटक्के म्हणाले, “गाडगेबाबांच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल केली पाहिजे.गो-शाळा काढून अखेरपर्यंत त्यांचा प्रवास राहिला.त्यांनी प्राणीमात्रावर दया करायला शिकवले.भूतदयेवर ते जगले.संस्थेच्या ध्येयधोरणानुसार कार्यक्रम घेतले जातात. पारंपारिक संस्कारानुसार एकत्रीत येता येते.”
शिवरत्न पुरस्कार विजेते अनिल वीर म्हणाले, “महापुरुषांच्या जयंती कितीही वेळा घ्यायला हरकत नाही.मात्र, त्या-त्या समूहानुसार मेळ घालणे गरजेचे आहे.संत गाडगेबाबांच्या विचारांवर चालण्यामुळे नुकसान होत नाही.कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगली जावू नये. आपापल्या ऐपतीप्रमाणे स्वतःचा अथवा समाजाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे.”
अंनिसचे प्रकाश खटावकर म्हणाले, “गाडगेबाबांनी दिलेल्या विचारानुसार वाटचाल केली पाहिजे.”त्यांनी सविस्तर माहिती मोबाईलच्या माध्यमातून सांगितली.
कोरेगाव येथील भजनी मंडळ यांनी टाळ-मृदुंगाच्या सहाय्याने गायन केले.त्यास बाळासाहेब बर्गे आणि सहकारी यांनी दात दिली.सदरच्या कार्यक्रमास संभाजी पवार,ऍड.विलास वहागावकर,डॉ.बाबासाहेब ननावरे, सी.जगताप,अंनिसचे कार्यालयीन प्रमुख भगवान रणदिवे, गणेश रोकडे,हणमंतराव साळुंखे,आजी-माजी पदाधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.
.
शिवरायांची जयंती ३ वेळा तर गाडगेबाबांची २ वेळा साजरी केली जाते. डॉ.आंबेडकर यांची तर दि.१४ एप्रिल पासून मे अखेर ठिकठिकाणी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.याशिवाय, विजयादशमी हा सणही विविध धर्मीय उत्साहात साजरा करतात.