छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पैठण तालुकाध्यक्ष
पैठण,(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील धनकनकेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री महोत्सव २०२५ निमित्ताने या संस्थानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पैठण तालुकाध्यक्ष तथा पत्रकार गजानन आवारे पाटील यांना शोध पत्रकारिता पुरस्कार यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे, आमदार विलास बापू भुमरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना खासदार संदीपान भुमरे म्हणाले की धनकनकेश्वर महादेव मंदिर संस्थान एमआयडीसी पैठण मुधलवाडी यांनी धार्मिक कार्यक्रमासह समाजातील विविध दहा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले हा एक अनोखा उपक्रम संस्थानने राबवला असून यामुळे समाजात निस्वार्थपणे काम करण्याचा गौरव केल्यामुळे त्यांना आणखी कार्य करण्याची प्रेरणा मिळाले तसेच उपक्रम राबविल्या बदल संस्थानचे प्रकाश जिजा लबडे सह त्यांच्या सहकाऱ्याचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब पाटील लबडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पुष्पा गव्हाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भाऊ लबडे, खरेदी विक्री संघाचे संचालक अंकुश बोबडे,माजी सरपंच अमोल गोर्डे, उद्योजक सुयोग भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक संभाजीराव झिंजुर्डे, पोलिस जमादार गणेश खंडागळे, कृष्णा उगले, बंडू आढाव,गवळी सह आदी उपस्थित होते.