सातारा : ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या महाराष्ट्राच्या वतीने शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे ,स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावी. यासाठी अकॅडमीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे वर्षभर ऑनलाईन क्लास मोफत ॲपच्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर आय एम विनर या नावाने स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये राज्यस्तरावर गुणोत्तर यादीमध्ये 200 विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी काही रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते, स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात हा शिष्यवृत्ती वितरण सोहळा पार पडला .
या सोहळ्यास आमदार चेतन तुपे पाटील , सहाय्यक आयुक्त अहिल्यानगर अनिकेत थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरातील राज्यस्तरीय ध्येयरत्न मोहन शिंदे, संगम बेजगमवार , मयूर कस्तुरे, अमोल अनमुलवाड, निलेश विटेकर, जहांगीर पटेल , गणेश पवार, रजनीकांत तुपारे, वशिष्ठ खोब्रागडे, बालाजी मुदगुडे ,श्रीम. मेघा शेवाळे, सौ गीतांजली पवार या 14 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श ध्येयरत्न व आदर्श प्राचार्य श्रीम. मोनाली पठारे, श्रीमती रत्ना शिंदे, श्रीम. प्रीती पाटील,श्रीम.कीर्तीकुडवे व योगेश हरणे यांना आदर्श मुख्याध्यापक पत्रकार कृष्णकांत कोबल , विजय लोखंडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट निवेदक म्हणून मुकेश इंगवले व अनुजा ओमासे यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे व राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे ,सचिव सोनाली गाडे, राज्यप्रमुख संदीप पाटील, सारिका शिंदे, उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.