उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
समर्थ चषक ही क्रिकेटची स्पर्धा नऊ वर्षे झाली आहे.यंदाचे १० वे वर्ष आहे.क्रिकेट खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या मागणीमुळे ही स्पर्धा होत आहे.कारण कोरोनाकालामुळे ही स्पर्धा बंद करण्यात आली होती.दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सुरु झालेली ही स्पर्धा ३० मार्च २०२५ पर्यंत चालू राहील.स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. त्यांना मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा ह्यासाठी हे स्पर्धा ठेवण्यात आले आहेत.कारण १२ वर्षाच्या अगोदर येथे १ लाखाच्या स्पर्धा होत नसत आणि ही १ लाखाची स्पर्धा उरण पूर्वविभागात प्रथमच समर्थ चषक स्पर्धे द्वारे आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मत स्पर्धेच्या प्रसंगी भाजप तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांनी व्यक्त केले.या स्पर्धेसाठी आयोजक भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड,माजी जिल्हा परिषद सदस्य भाई जीवन गावंड,दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील,समीर पाटील,भार्गव म्हात्रे,संदीप गावंड,निलेश पाटील,महेश गावंड,नितीन म्हात्रे,अजित जोशी,गजानन गावंड,कल्पेश गावंड,नरेंद्र गावंड,पंकज गावंड,जितेंद्र गावंड,के.वाय.गावंड माजी सरपंच,प्रमोद म्हात्रे प्राध्यापक,रवी म्हात्रे,पी.के. पाटील,विशाल गावंड,प्रिंस गावंड,आमिष गावंड,नवीन गावंड,अनाधी गावंड आणि उरण तालुक्यातील,पंच क्रोशीतील तील प्रेषक,आजी माजी खेळाडू ,श्री.गणेश महिला मंडळ,गावंड कुटुंब यांनी भरपूर मेहनत घेत आहेत.ह्या सर्वांचे एकच उद्दीष्ट आहे ही स्पर्धा यशस्वी व्हावी.यासाठी सर्वच मान्यवर प्रयत्नशील आहेत. उत्तम आयोजन व नियोजन असल्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.