महाबोधी बुद्धविहार ताब्यात देण्यासाठी आंदोलन

0

सातारा : भारतातील बिहार राज्यातील बुद्धगयामधील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे.तसेच १९४९ चा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा.या मागणीसाठी चालू आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा प्रणित श्रामनेर संघाच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण – आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाले. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.

          प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय शिक्षक भागवत भोसले व व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पडला.तद्नंतर जयघोष करीत पोवई मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुद्धपुजा करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ.गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अनुक्रमे अनिल वीर व ऍड.हौसेराव धुमाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंदकुमार काळे यांनी सूत्रसंचालन केले.संपूर्ण नियोजन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,महासचिव दिलीप भोसले,तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे व त्यांचे पदाधिकारी यांनी नियोजन केले. त्यामध्ये श्रमनेरतर्फे चंद्रकांत खंडाईत व त्यांचे सहकारी यांनी साह्य केले.

यावेळी शिवनाथ जावळे,आप्पा मोरे, किसन खंदारे,संघमित्र मोरे यांच्यासह श्रामणेर संघ मोठ्या संख्येनी उपस्थीत होता.सदरच्या आंदोलनात महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर. थोरवडे,भारतीय बौद्ध महासभेचे कराड तालुकाध्यक्ष आप्पा अडसूळे व जिल्हा आजी-माजी पदाधिकारी,विद्याधर गायकवाड, समाधान कांबळे,सुमारे ५० श्रामणेर यांनी आंदोलनात सहभाग घेतला.त्यामध्ये सुनील कदम,दादासाहेब कांबळे, किशोर गायकवाड,बाळासाहेब जगताप,योगेश कांबळे,अनिल कांबळे, बाळासाहेब जाधव,शरद कदम,परिहार,सपकाळ बंधू, उपासक व उपासिका, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, ज्येष्ट नागरीक संघाचे सचिव बी.एल.माने, त्रिरत्न महासंघाचे धम्मचारी संघादित्य, धम्ममित्र विश्वास सावंत, अजित जगताप,रिपब्लिकन पक्षाचे गणेश कारंडे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ओव्हाळ,संदीप जाधव, कल्पना कांबळे व महिला उपासक उपस्थीत होत्या. देश-विदेशात आंदोलन चालू असुन लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाची व्याप्ती वाढवावी लागेल.असा गंभीर इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here