जागोजागी उगवले
केवढे कायदे पंडित
आपले (अ) विचार
सांगतात अ खंडित…
पाणीघाले एकीकडे
रोप दुस-या कुंडीत
पहात फिरे भविष्य
काय आहे कुंडलीत …
दुष्काळ पडे बुध्दीत
अक्कल गेलेसांडीत
हत्ती गेला शेपूटमागे
नेमके पकडे सोंडीत…
नवसबोलला देवाला
बसे देवस्थान हिडींत
दमडाही उरला नाही
टाका दक्षिणा हुंडीत…
असे होई तसे होईलं
गणित बसले मांडीत
उठा बशा काढू कशा
जोर न उरला मांडीत…
रसद तोडून सैन्यांची
वेळेत पकडे खिंडीत
वीज वाटतात फुकट
प्रवाह करता खंडित …
हुंडीत ..
असे मंजूर पीककर्ज
शेती करावी कुंडीत
नवस बोले खरोखर
खोटीनाणी रे हुंडीत
चाकू लपवी खिशात
पायी चालले दिंडीत
चोरकोण कोण साव
कळत नाही झुंडीत
आपले (अ) विचार
सांगतात अ खंडित
वीज वाटतात फुकट
प्रवाह करता खंडित
स्वस्त केले पंखे एसी
रे कडाक्याच्याथंडीत
जेष्ठांना फुकट प्रवास
आजारांनी जे पीडीत
मजा गंमत चेष्टा सर्व
सोसा विनोद गोडीत
चाके सगळे संपावरी
बसवा सुसाट गाडीत
दुष्काळ पडे बुध्दीत
अक्कल गेले सांडीत
हत्ती गेला शेपूट मागे
नेमके पकडे सोंडीत
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..