उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्नीकडून जिवे मारण्याचा प्रयत्न !

0

छत्रपती संभाजीनगर : येथील निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना त्यांच्या पत्नीने मित्राच्या मदतीने जीवनातून संपविण्याचा डाव आखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने आई, भाऊ, मित्र आणि घरातील मोलकरीण यांच्यासोबत कट रचून जातिवाचक शिवीगाळ करून अन्नातून विषप्रयोग केल्याचे फर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी रविवारी (३० मार्च) सातारा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सारिका देवेंद्र कटके (४७), विनोद कैलास उबाळे (३८) आणि आतिष साहेबराव देशमुख (४२), सुवर्णा साहेबराव देशमुख , छाया बालाजी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. यातील सारिका, विनोद आणि आतिष यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here