डॉ.बाबासाहेब व माता रमाई यांच्यातील हितगुज दिशादर्शक !

0

सातारा : सर्वार्थाने बाबासाहेब यांच्या उंचीपूढे माता रमाई साधेपणाने राहिल्या.त्यांनी अखेरपर्यंत बाबासाहेबाना सावलीसारखी साथ दिली. मात्र,सहजपणाने त्यांचे हितगूज होते.त्या दोघांनी सर्वांगसुंदर समाज निर्माण करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत केलेले हितगुज व कार्य दिशादर्शक आहे.अशा आशयाचे मनोगत अनेकांनी व्यक्त केले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा मंगल परिणयाचा वाढदिवस येथील डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

   

यावेळी सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सचिव बी.एल.माने,दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश खंडझोडे,अंनिसचे कार्यकर्ते प्रकाश खटावकर व संबोधी प्रतिष्ठानचे कार्यवाह ऍड.हौसेराव धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थासपक अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले.

   

प्रथमतः डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार बी.एल. माने,ऍड.हौसेराव धुमाळ,विलास कांबळे व अंकुश धाइंजे यांनी अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली. सामुदायिक वंदना घेण्यात आली.सम्यक ज्येष्ट नागरिक संघातर्फे डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त पाणी व मिठाई वाटप फलकाचे अनावरण करण्यात आले.

   यावेळी त्रिरत्न महासंघाचे धम्ममित्र विश्वास सावन्त,ज्येष्ट विश्वास सावंत,सांची ओव्हाळ,आरती गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या जिल्हाध्यक्षा पुजाताई बनसोडे व सहकारी महिला, शहराध्यक्ष तथा संयुक्त जयंती समारोहचे अध्यक्ष अक्षय कांबळे व सहकारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here