कधींकधीं नेत्यांना
करावे लागे वेटींग
हाय कमांड सतावे
मुळी जमेना मिटींग…
काम व्हावे यशस्वी
सर्वत्र लावा सेटिंग
बाकीचे मॅटर साफ
झकास करे कटिंग…
आपणा मताधिक्य
यशस्वी हो व्होटिंग
सट्टे बाज नेम बाज
बाहेर लागले बेटिंग…
गाडी योग्य रुळावर
उचीत लावा शंटिंग
जपून रहावे जरासे
लपूनकाढती शूटिंग…
रे पुरावे खोल पुरावे
होऊ द्या पूर्ण हंटिंग
सावध सतर्क संपूर्ण
शरण येतीलं धटिंग…
आपलेचं आहे मैदान
नीट लावा फिल्डींग
हक्क पक्ष कार्यालय
उभी करुया बिल्डिंग …
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996