शिवसेना नांदेड उपतालुका प्रमुखपदी विठ्ठल पाटील कळके यांची निवड..

0

नवीन नांदेड:- शिवसेनेचे संस्थापक मुख्य नेते  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजयभाऊ मोरे , उपनेते आ. हेमंत पाटील . आ बालाजी कल्याणकर . आ आनंदराव बोंढारकर . आ बाबुराव कदम कोहळीकर .यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख विनय गीरडे पाटील यांच्या हस्ते त्यांच्या सहीनिशी शिवसेना नांदेड उपतालुका प्रमुख पदी विठ्ठल पाटील कळके यांची दि २ एप्रील रोजी सिडको येथिल शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली . 

विठ्ठल पाटील कळके हे सध्या नांदेड तालुक्यातील कल्हाळ गावचे विद्यमान सरपंच असून ते गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक राजकिय क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले असून आजवर सामाजिक  क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना नांदेड उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली असून दि २ एप्रील रोजी शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख विनय गीरडे पाटील यांच्या हस्ते  शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली असून यावेळी मा सरपंच संतोष बारसे .सरपंच कामाजी कदम . मा सरपंच लोभाजी गवारे . लक्ष्मीकांत जाधव . देवराव पांचाळ . सोम भारती महाराज . गजानन कोकाटे . विजय पांचाळ . शिवाजी भारती .राजू निखाते . दयानंद वाघ यांच्या सह आदीं कार्यकर्ते यांची उपस्थिती होती या नियुक्ती पत्रावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण 

 आपण सक्रियपणे प्रचार प्रसार कराल व तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन वाढवून कार्य कराल असा विश्वास व्यक्त करूण आपणास पुढील कार्यास शुभेच्छा देते असा उल्लेख नियुक्ती पत्रात केलेला आहे. या निवडी बद्दल त्यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला जात असून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here