सातारा : महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गुरुवार दि.११ रोजी ठिकठिकाणी साजरी करण्यात येणार आहे.त्या दिवसापासून अनेक कार्यक्रम होणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे गुरुवार दि.११ रोजी म.ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी १० ।। वा.अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ऍड.विलास वहागावकर मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती चंद्रकांत खंडाईत यांनी दिली. सायंकाळी ५ वा. जयदेव गायकवाड यांचे व्याख्यान संयुक्त जयंती समारोहतर्फे आयोजीत करण्यात आले आहे.अशी माहिती प्राचार्य अरुण गाडे यांनी दिली.दरम्यान, दुपारी ३।। वा.वाठार किरोली येथे अनिल वीर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ट बौद्धाचार्य अनिल कांबळे यांनी दिली.
सोमवार दि.१४ रोजी मुख्य दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा असून प्रामुख्याने सर्वत्र विविध उपक्रमाने जयंती साजरी केली जाते.मात्र,मे अखेर संयुक्त जयंतीचे ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.दि.२८ ते दि.२० अखेर समितीतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यासत आले आहे. त्रिपुडी,ता.पाटण येथे संयुक्त जयंतीचे आयोजन रविवार दि.११ मे रोजी अष्टशील प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.शिवाय, कासरूड,ता. महाबळेश्वर येथेही सुमारे आठवडाभर जयंतीसह विहाराचे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.अशीही माहिती समाजप्रबोधन मंडळातर्फे देण्यात आली आहे.सोमवार दि.१२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात सर्वत्र कार्यक्रम होणार आहेत.