नवीन नांदेड:- शिवसेनेचे संस्थापक मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजयभाऊ मोरे व ओबीसी नेते शिवसेनेचे ओबीसी व्हिजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या नेत्तृत्वाखाली त्यांच्या सूचने नुसार नांदेड जिल्हा उपाध्यक्ष अंगद पाटील ईमडे व मुखेड तालूका प्रमूख आनंद श्रीरामे यांच्या हस्ते दि ४ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील विविध पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली .
यावेळी मुखेड तालूका उपाध्यक्ष विठ्ठल गोणारे . सचिव पदी नामदेव सोलंकर . संघटक पदी बळवंत परमाळे . बाऱ्हाळी जिप सर्कल प्रमुख पदी मनोहर नाईक . मुक्रामाबाद जिप सर्कल प्रमुख पदी तुकाराम देवकते . जांब सर्कल प्रमूख पदी रामेश्वर पायनापल्ले . सावरगांव सर्कल प्रमुख पदी बाबुराव बर्गे . गोजेगाव गण प्रमूख पदी रामेश्वर चामणकर आदींची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
हे सर्व पद अधिकारी गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक राजकिय क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले असून आजवर सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी पक्षाच्या विविध पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अगंद ईमडे . मुखेड तालूका अध्यक्ष आनंद श्रीरामे. उत्तम हावडे . नामदेव देवमारे . बिरबल नाईक . पांडुरंग पाटील . नागनाथ गोणारे . विलास ईमडे . उमेश ईमडे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती
या नियुक्ती पत्रावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार प्रसार कराल व तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन वाढवून कार्य कराल असा विश्वास व्यक्त करूण आपणास पुढील कार्यास शुभेच्छा देते असा उल्लेख नियुक्ती पत्रात केलेला आहे.
या निवडी बद्दल शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी जिल्हाप्रमूख अनिल पाटील धमने यांनी फोन च्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या असून या पुढे सर्वांनी पक्षात सक्रिय पणे काम करून आपले नेते शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी महाराष्ट्र प्रदेशाध्य तथा राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेचे मूख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ थाई शिंदे यांचे हात बळकट करूण ओबीसी व्हिजे एनटीच्या माध्यमातुन बहुजन समाजातील छोट्या मोठया सर्व समाजातील होतकरू महिला पुरुषांनी पक्षात कामाची जबाबदारी देऊन त्यांना काम करण्याची संधी देऊन संघटन मजबुत करण्याचे काम करायचे असल्याचे बोलले असून या पद अधिकारी यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.