अनिल वीर सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दि.१० रोजी रिपाइंतर्फे विविध मागण्यांसाठी लाक्षणीक आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयाचं एडिट करावे. दोषी असल्यास त्यांचे अनुदान बंद करावे.याशिवाय,पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गरोदर मातेची हेळसांड झाली होती. यावरूनच सातारा जिल्ह्यामधील अनेक धर्मदाय हॉस्पिटल आहेत. त्यामध्ये रुग्णांसाठी दहा टक्के भेट राखीव ठेवलेले नाही. साताऱ्यामधील निरामय हॉस्पिटल, कराड मधील कृष्णा चॅरिटेबल त्यानंतर इतर हॉस्पिटलची योग्य ती चौकशी करून संबंधितांना मिळणारे शासकीय अनुदान रोखणे गरजेचे आहे.
लिंब ता.सातारा ऊसतोड मजूर सागर संजय मोरे याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल केली असून सातारा व कोरेगाव गुन्हात तो फरार आरोपी आहे.त्यास अटक करावी.पोलिसाच्या वरदहस्त मुळे कवठे येथील सोमन जगदाळे तर विजयनगर येथील जाधव इत्यादी आरोपीही फरार आहेत. तसेच त्यांच्या गाड्याही पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाहीत.जिल्हयातील हजारो सभासदांना करोडो रुपयाचा गंडा घालणाऱ्या येथील श्री ढाकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रतापगंज पेठ येथील व्यवस्थापक तसेच चेअरमन यांच्यावर फसवणुकीच्या गुन्हा अंतर्गत मकोकांतर्गत कारवाई करावी. एका महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या ठेवी सर्वसामान्य कडून गोळा करण्यात आलेल्या आहेत. तरीसुद्धा व्यवस्थापक व चेअरमन, कॅशियर-यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. तेव्हा त्वरित कारवाई करावी. या मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्यावतीने लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.
याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक (शहर पोलीस स्टेशन) यांच्याकडे सुनील ओव्हाळ, राजेश जाधव,सचिन माने व विनोद ओव्हाळ यांनी दिले आहे.