नवीन नांदेड – विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदी निवड झाल्या बद्दल विधानभवन येथिल त्यांच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला काही कामानिमित्त विधान भवन, मुंबई येथील कार्यालयात शिवसेना ओबीसी/व्हीजेएनटीचे नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने . धुळे जिल्हाप्रमुख संजय कुसळकर पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे यांनी भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांची विधान भवन, मुंबई येथील कार्यालयात काही महत्वाच्या कामा निमित्त विशेष भेट घेऊन सत्कार करताना शिवसेना ओबीसी/व्हीजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा) बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणारे ओबीसी/व्हिजेएनटीचे नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने, धुळे जिल्हाप्रमुख संजय कुसळकर, पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे व धाराशिव जिल्हाप्रमुख कमलाकर दाणे यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी सभापती शिंदे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार सन्मान करून विविध विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात केली.
सभापती महोदयांनी जवळ १० मिनट त्याचा अनमोल वेळ देऊन चर्चा झालेल्या अनेक विषयावर समाधान कारक बोलणे झाल्यामुळे शिवसेना ओबीसी/व्हिजेएनटीचे धुळे जिल्हाप्रमुख संजय कुसळकर, नांदेड जिल्हा जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने, पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे,धाराशिव जिल्हाप्रमुख कमलाकर दाणे आदींसह इतर कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.