सत्यशोधक ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने बाबासाहेब जगजेत्ते ठरले  !

0

सातारा : विद्येविना मती गेली । मतिविना नीती गेली । नीतिविना गती गेली । गतिविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले.फुले दाम्पत्यांमुळे दिनदुबळ्यांची मुले ज्ञान व विद्यादाते झाले. म. ज्योतिबा फुले यांची प्रेरणा घेऊन बाबासाहेब हे जगातील एकमेव सर्वोत्कृष्ट व विद्वान ठरले.असे प्रतिपादन ऍड.प्रा.विलास वहागावकर यांनी केले. सत्यशोधक समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची जयंती येथील डॉ.बाबासाहेब पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली.तेव्हा ऍड.वहागावकर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षतेखानी संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे होते.

         

 ऍड.वहागावकर म्हणाले, “म.फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली.१८५६ साली हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा केला.त्यांनी सत्यशो समाजाची स्थपना केली.अमेरिकेत काळ्या गुलामाप्रमाणे भारतातील खालच्या जातीतील लोकासारखीच असल्याने गुलामगिरी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला.त्यासाठी त्यांनी १८७३ मध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिले.शेतकरी कर्जबाजारी व व्यसनी होऊन आत्महत्या करतात.म्हणून शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तकही त्यांनी लिहिले.१८४८ साली भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू केली.पाण्याचा हौद अस्पृश्याना खुला करून दिला.शिक्षणाची प्रगती अधिक तो प्रगत होत असतो.म्हणून त्यांनी दिनदलितांना चक्र वेगाने फिरवले यश मिळते.असा शिक्षणाचा मंत्र दिला.म्हणूनच उच्च पदापर्यंत पोहचल्याची अनेक उदाहणे आहेत.म.फुले कंत्राटदार म्हणूनही पुणे बंडगार्डन येथे तीन पूल बांधले होते.१८६३ ला त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. पंडितांनी धोंडू कुंभारला मारेकरी म्हणून पाठवले होते. मात्र,त्या गुंडाचे म.फुलेंनी परिवर्तन करून पंडित बनवले.जे एस डग्लस यांनी संशोधन केले असले तरी छ. शिवरायांची समाधी म.फुलेंनी शोधून काढून पहिली जयंतीही त्यांनी साजरी केली.” याशिवाय म.फुले यांच्या जीवनपटावरही ऍड.वहागावकर यांनी प्रकाशझोत टाकला.शाहिर प्रकाश फरांदे म्हणाले,”म.फुले यांनी १७ शाळा काढून बहुजनांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.”

     अध्यक्षस्थानावरून बोलताना रमेश इंजे म्हणाले,”जर फुले दाम्पत्यांनी शाळाच काढल्या नसत्या तर आजची परिस्थिती कशी असते ? महापुरुषांच्या विचारांवर समाज प्रगतीपथावर जात आहे.तेव्हा प्रत्येकांनी युक्ती व कृती विचारपूर्वक करावी.” इंजे यांनी अनेक गोष्टींचा उलगडा करीत उदाहरणद्वारे स्पष्टीकरण केले.शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी अभिवादनपर गीते सादर केली. प्रभाकर बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.बंधुत्व प्रतिष्ठा नचे संस्थापक अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले.जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव दिलीप फणसे यांनी आभार मानले.

 

  सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते उत्तम पोळ,मारुती भोसले,तुकाराम गायकवाड,अशोक भोसले, प्राचार्य अरुण गाडे,अंनिसचे डॉ.दीपक माने,वामन मस्के, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, धम्मचारी संघादित्य, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षा पुजाताई बनसोडे,मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गाल्फाडे, उपाध्यक्ष बंडू घाडगे, जयंती समारोह समितीचे अध्यक्ष अक्षय कांबळे,दीपक गाडे,दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष अरविंद गाडे, शहाराध्यक्ष कुंदन तडाखे,भीम आर्मीचे दीपक गाडे,वैभव गवळी,चरणदास जगताप,सतीश गाडे,हर्ष गाडे, सूरज कांबळे, नाना बनसोडे, किरण कांबळे, अक्षय कदम, विनोद कांबळे, उषाताई गायकवाड,भाग्यश्री खिलारे, सूरज कांबळे,अतुल कांबळे, विठ्ठल जोगदंडे, राहुल मस्के, अमोल वायदंडे,मनोज वायदंडे, विश्वास सावन्त, शिवनाथ जावळे,कृष्णा गव्हाळे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here