[ad_1]
Bhuvneshwar kumar big statement: भारतीय क्रिकेटचा स्विंग मास्टर म्हणजे भुवनेश्वर कुमार. भुवी सध्या आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाकडून खेळत आहे. तो तिथे उत्तम कामगिरी करत आहे. भुवीने अलीकडेच एल मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याच्या कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भुवीने त्याच्या प्रेमकथेपासून ते पदार्पणाबद्दल आणि आयपीएलबद्दल मोकळेपणाने अनेक गोष्टी सांगितल्या. आयपीएलमधील खेळाडूंमधील संभाषणाबाबत या स्टार खेळाडूने असे काही सांगतले आहेत ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
खेळाडू एकमेकांशी काय बोलतात?
आयपीएल २०२५ चा जवळजवळ अर्धा सीजन संपत आला आहे. या स्पर्धत रंजक सामने तर होतातच पण या शिवाय खेळाडूंचे मजा आणि मस्तीचे व्हिडीओही तुम्ही बघितले असतील. सामन्यानंतर अनेक वेळा खेळाडू एकमेकांशी बोलतानाही दिसतात. ज्याचेही व्हिडीओही व्हायरल होत असतात. यावर भुवीने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अशाप्रकारे बोलणाऱ्या खेळाडूंना फटकारले आहे आणि २ मिनिटेही तेव्हा क्रिकेटबद्दल बोलणं होत नाही असे उघड केले आहे.
हे ही वाचा: शाकाहारी असूनही विराट कोहली खातो ‘हे’ खास मांस… ते काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
नक्की काय म्हणाला भुवनेश्वर?
भुवनेश्वरने बिअर बायसेप्स यूट्यूब चॅनलवर पॉडकास्ट दरम्यान म्हणाला की, “आम्ही मजा असतो, खूप हसणे आणि फक्त बकवास, ज्याचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. जर कोणी १० मिनिटे बोलत असेल तर फक्त २ मिनिटे क्रिकेटबद्दलच चर्चा होते.”
हे ही वाचा: पराभवानंतर धोनीचा राग अनावर… अंपायरलाच सुनावले, ‘हे’ ठरले पराभवाचे कारण? Video Viral
भुवनेश्वर कुमार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम योगदान देत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल २०२५ मध्येही शानदार गोलंदाजी करत आपली छाप सोडली आहे, परंतु विकेट्सच्या बाबतीत तो मागे आहे. तो आता भारतीय निवडकर्त्यांच्या नजरेतून बाहेर झाला आहे. त्याने २०२२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. गेल्या तीन वर्षांपासून तो टीम इंडियामध्ये परतलेला नाही.
[ad_2]