Mohammed Siraj express his anger through social media post over Pahalgam Terrorist Attack

0

[ad_1]

जम्मू काश्मीरच्या पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) निषेध केला आहे. मोहम्मद सिरजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना आणि संताप व्यक्त केला आहे. दहशवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 नागरिकांचा मृत्यू झाला असून, यामधील बरेचसे पर्यटक आहेत. 2019 मधील पुलवामानंतर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. मोहम्मद सिराजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना हे राक्षसी कृत्य असून, दहशतवाद्यांना शिक्षा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. 

“नुकतंच पहलगाम येथे झालेल्या भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ल्याबद्दल वाचलं. धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करुन हत्या करणं हे पूर्णपणे राक्षसी आहे. कोणतंही कारण, विश्वास, विचारसरणी या राक्षसी कृत्याचं समर्थन करु शकत नाही,” असं मोहम्मद सिराजने म्हटलं आहे.

“ही कोणती लढाई आहे, ज्यामध्ये माणसाच्या आयुष्याची काही किंमत नाही?,” अशी विचारणाही त्याने केली आहे. “कुटुंबांना किती वेदना आणि आघात सहन करावा लागत असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. कुटुंबांना या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. तुमच्या नुकसानाबद्दल आम्हाला खूप वाईट वाटते. मला आशा आहे की हे वेडेपणा लवकरच संपेल आणि या दहशतवाद्यांना शोधून काढत दया न दाखवता शिक्षा व्हावी,” असंही सिराज म्हणाला आहे.

मोहम्मद सिराजसह अनेक भारतीय क्रिकेटर्सनी पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध केला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणनेही त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. “पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे आणि न्याय लवकर मिळावा अशी मी प्रार्थना करतो,” असं त्याने म्हटलं आहे. 

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यानेही त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केलं आहे की, “आज काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याने मन दुखावले आहे. मी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आपल्या शूर सैन्य, जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दलांसोबत एकजुटीने उभा आहे. न्यायाचा विजय होईल.”



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here