रायपूरवरुन हैद्राबादकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याने द बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार २२ एप्रिल रोजी रात्री ८:४५ वाजता तालुक्यातील सौंदड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडला. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली व सर्व प्रवाशांना त
.
रायपूरहून हैद्राबादला जाणारी कान्केर ट्रॅव्हल्स बस क्र. (सीजी ०४/एनए ७७७६) ही मंगळवारी रात्री ८:४५ ला सौंदड जवळील उड्डाणपूलाच्या सर्विस रोडवरील फुटाळा महामार्गावरून जात असता बसच्या मागील बाजूला शॉर्ट सर्किटने आग लागून पेट घेतला. बसचालक के.गिरी यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरविले. पाहता पाहता बसने उग्र रूपात पेट घेतला. यामध्ये बसमधून घाईघाईने उतरलेल्या सर्व २८ प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.
या घटनेची माहिती तातडीने सडक/अर्जूनी नगरपंचायत अग्निशमन दलाला मिळाली. तात्काळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून ही आग आटोक्यात आणली. हा महामार्गावरील “दि बर्निंग बस”चा थरार जनतेने व्हीडीयोत कैद केला आहे. ट्रॅव्हल्समधील सर्व २८ प्रवाशी चालक के.गिरी यांच्या समयसूचकतेने सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती होताच डुग्गीपार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश काळे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने जळलेली बस रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.