Indian Government blocks YouTube channel of Former Pakistan cricketer Shoaib Akhtar

0

[ad_1]

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरवर (Shoaib Akhtar) मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) युट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

क्रिकेट सामन्यांचं विश्लेषण आणि जागतिक क्रिकेटवर नेहमी भाष्य करत असल्याने शोएब अख्तर भारतातही लोकप्रिय आहे. केंद्र सरकारने फक्त शोएब अख्तरवर कारवाई केली नसून, त्याच्यासह इतर 16 इतर चॅनेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्म्सचे एकत्रितपणे सुमारे 6.3 कोटी सबस्क्रायबर्स आहेत. त्यात डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा समावेश आहे.

याआधी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारत यापुढे पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट खेळणार नाही असं स्पष्ट केलं होतं. शुक्ला यांनी पाकिस्तानमध्ये ‘द रेझिस्टन्स फ्रंट’च्या सदस्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता.

भारताने 2013 मध्ये पाकिस्तानसोबत अखेरची द्विपक्षीय मालिका खेळली होती. तेव्हापासून, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौरा केला नव्हता. भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. भारत फायलनमध्ये पोहोचल्याने अंतिम सामनाही दुबईत खेळवण्यात आला होता. 

राजीव शुक्ला यांच्याव्यतिरिक्त, अनेक क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेटपटूंनी या हल्ल्याचा निषेध केला होता आणि बीसीसीआयला पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी केली होती. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीदेखील होता. “100 टक्के, भारताने हे करायला हवे (पाकिस्तानशी संबंध तोडून टाकावे). कठोर कारवाई करायला हवी. दरवर्षी अशा गोष्टी घडत आहेत हे हास्यास्पद आहेत. दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही,” असं सौरव गांगुलीने म्हटलं.

हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांवर आणि हल्ल्याशी संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. “आज बिहारच्या मातीतून मी संपूर्ण जगाला सांगतो. भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना ओळखेल, त्यांचा माग काढेल आणि  शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू,” असं पंतप्रधान मोदी यांनी 24 एप्रिल रोजी म्हटलं होतं.

“दहशतवाद भारताला हताश करु शकत नाही. दहशतवाद शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण देश या निर्धारावर ठाम आहे,” असं मोदी पुढे म्हणाले होते.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here