[ad_1]
Auto News Maruti Cars : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये बहुतांश कार कंपन्यांनी मागील दशकभराच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित कारचे बहुविध मॉडेल सादर केले. त्यात सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या कार सादर करण्याची धुरा मारुतीनं पेलली. दमदार मायलेज, किमान देखभाल खर्च आणि दीर्घकाळ टीकणारं मॉडेल ही मारुतीची जमेची बाजू. मात्र सुरक्षिततेच्या निकषांवर या कारला इतर कंपन्यांच्या कार मागे टाकत होत्या.
मारतीची एक कार मात्र इथं अपवाद ठरली. नुकतंच सेकंड हँड कारची विक्री आणि खरेदी करण्याची सुविधा पुरवणाऱ्या ई कॉमर्स संकेतस्थळाच्या एका सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार मारुतीच्या कार किमान 5 वर्षे वापरल्यानंतरही जेव्हा रिसेल केल्या जातात तेव्हासुद्धा त्यांना चांगली किंमत मिळते. स्पिनीच्या सर्व्हेचा हवाला देत ऑटोकारनं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार हे सर्व कार मॉडेल भारतात फ्लीट व्हिकल म्हणून लोकप्रिय आहेत. ज्यांना इतर कारच्या तुलनेत चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे.
70 टक्के रिसेल व्हॅल्यू आणखी काय हवं?
स्पिनीच्या सर्वेक्षणानुसार मारुती सुझुकीची डिझायर ही अशी कार आहे, ज्यामध्ये 5 स्टार सेफ्टी असून मागच्याच वर्षी कंपनीनं ही कार लाँच केली होती. कारची एक्स शोरुम किंमत 6.84 लाख रुपये इतकी असून, नव्या मारुती डिझायरमध्ये 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 80 bhp पॉवर आणि 112 Nm इतका टॉर्क जनरेट करतं. 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा पर्यायांसह ही कार सीएनजी पर्यायामध्येही उपलब्ध आहे. या कारचं पेट्रोल व्हेरिएंट 24.79 kmpl आणि CNG व्हेरिएंट 33.73 km/kg इतकं मायलेज देतं.
राहिला मुद्दा रिसेल व्हॅल्यूचा तर, मारुती डिझायच्या एकूण दरात 33 टक्क्यांची घट अपेक्षित होते. पण, सर्वेक्षणातील इतर कारच्या तुलनेत या कारची रिसेल व्हॅल्यू 70 टक्के आहे ही महत्त्वाची बाब. होंडा आणि टाटाच्या कारनाही मारुतीची ही बजेटमध्ये येणारी तरीही लक्झरी अनुभव देणारी कार आजही आघाडीवर आहे. त्यामुळं खिशाला परवडणारं हक्काचं वाहन खरेदी करायचं असेल तर मारुतीची ही कार तुमचं ‘डिझायर’ पूर्ण करेल यात शंका नाही.
[ad_2]