10 players retired out and 15 duck first time this happen in women t20 international match qatar vs karachi

0

[ad_1]

T20 Cricket : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप आशिया रिजन क्वालिफायर अंतर्गत शनिवार 10 मे रोजी यूएई आणि कतार दरम्यान एक सामना खेळवण्यात आला. बँकॉकच्या ट्रेड थाई क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान असं काही झालं जे पाहून सर्वच हैराण झाले. टी20 क्रिकेटच्या इतिहासात असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. यूएई आणि कतार यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एक दोन नाही तर तब्बल 10 फलंदाज रिटायर्ड आउट झाले. 

पहिल्यांदा बनला एक आगळावेगळा रेकॉर्ड : 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात असं प्रथमच घडलं जेव्हा दोनपेक्षा जास्त फलंदाज रिटायर्ड आउट झाले. या सामन्यात टॉस जिंकून यूएईने प्रथम फलंदाजी निवडली आणि 16 ओव्हरपर्यंत त्यांनी एकही विकेट न घालवता 192 धावा केल्या. त्यावेळी यूएईची कर्णधार आणि फलंदाज ईशा ओजा 113 आणि तीर्था सतीशने 74 धावांवर नॉटआउट होती. परंतु यूएईने मग अचानकपणे त्यांची इनिंग संपवण्याचा निर्णय घेतला. 

आयसीसीच्या नियमांनुसार व्हाइट बॉल क्रिकेट म्हणजेच वनडे आणि टी 20 फॉरमॅटमध्ये संघ स्वतः इनिंग संपवण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. तशी परवानगी दिली जात नाही. तेव्हा यूएईने ईशा आणि तीर्था शिवाय आठ इतर खेळाडूंना सुद्धा रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यूएईचा संघ हा 16 ओव्हर्समध्ये 192 धावांवर ऑल आउट झाला. 

हेही वाचा : IPL 2025 बाबत मोठी अपडेट! सर्व खेळाडूंना दोन दिवसांत….; BCCI चे निर्देश

 

विजयासाठी 193 धावांचं टार्गेट असताना कतारने सुरुवातीपासूनच विकेट्स गमवायला सुरुवात केली. यामुळे कतारची स्थिती ही 29 धावांवर ऑल आउट अशी होती. त्यामुळे यूएईने 163  धावांनी हा सामना जिंकला. सलामीवीर रिझफा बानो इमॅन्युएलने सर्वाधिक 20 धावा केल्या. युएईकडून फिरकी गोलंदाज मिशेल बोथाने 11 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तर केटी थॉम्पसनला दोन विकेट घेण्यात यश आले. 

युएईचे 8 फलंदाज हे खात न उघडताच रिटायर्ड आउट झाले, तर कतारचे तब्बल सात फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. म्हणजेच या सामन्यात 15 फलंदाजांनी आपले खातेही उघडले नाही. महिलांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 15 फलंदाज शून्य (डक) धावांवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here