‘विराट कोहली क्रिकेटला कायमचा रामराम करेल’ माजी भारतीय प्रशिक्षकाचं मोठं विधान!

0

[ad_1]

Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार दिग्गज फलंदाज विराट कोहलीने नुकतेच कसोटी क्रिकेटला अलविदा केलंय. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आता कसोटी जर्सीमध्ये दिसणार नाही.यानंतर देशासह जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांना दुःख झालंय. पण हे कधीतरी घडणारच होते. आता माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटबद्दल मोठे विधान केलंय. त्यांनी काय म्हटलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीच्या रिटार्टमेंटवर भाष्य केलंय. ‘तो भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळेल. पण मला माहितीय की, जेव्हा विराट कोहली पूर्णपणे क्रिकेट सोडेल तेव्हा तो या खेळापासून खूप दूर जाईल. तो अशा प्रकारचा माणूस नाही जो प्रशिक्षक बनू इच्छितो किंवा ब्रॉडकास्टरची भूमिका बजावू इच्छितो. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे. ही गोष्ट मला नेहमीच लक्षात ठेवेने. त्याने कधीही एक इंचही हार मानली नाही’, असे रवी शास्त्री म्हणाले.

मानसिक थकव्यामुळे 

‘मला खात्री आहे की विराटचे अजून 2 वर्षे कसोटी क्रिकेट खेळणे बाकी आहे. मला त्याला या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये पहायला आवडले असते. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला कर्णधारपद देणे हा योग्य निर्णय असता. पण निवृत्तीचा निर्णय का घेतला? हे त्यालाही चांगले माहित असेल. कदाचित हे मानसिक थकव्यामुळे असेल. तो इतर खेळाडूंइतकाच तंदुरुस्त आहे. तो त्याचे शरीर चांगले ओळखतो, असे रवी शास्त्री म्हणाले. 

विराटची कारकीर्द

विराट कोहलीने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. असे करताना त्याने 30 शतके देखील केली आहेत. विराट 10 हजार धावांपासून फक्त 770 धावा दूर होता. हा एक मोठा विक्रम देखील आहे. पण आता तो हा विक्रम करू शकणार नाही.

काय म्हणाला मोहम्मद कैफ? 

12 मे रोजी इंस्टाग्राम अकाउंटवर विराटने पोस्ट शेअर करून तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. याच्या 5 दिवसांपूर्वी भारताचा टेस्ट कर्णधार रोहित शर्माने या फॉरमॅटमधून अचानकपणे  निवृत्ती जाहीर केली होती. माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ म्हणाला की, ‘मला वाटतं की त्यांना अजून या फॉरमॅटमध्ये खेळायचं होतं. त्यांचं बीसीसीआय सोबत काही बोलणं झालं असेल, पण सिलेक्टर्सनी मागील 5 ते 6 वर्षांचा त्यांचा फॉर्म पाहून त्यांना सांगितले असावे की आता तुमची संघात जागा नाही. खरंच काय घडलं हे आपल्याला कधीच कळणार नाही, पण पडद्यामागे काय घडलं याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे’. मोहम्मद कैफ पुढे म्हणाला की, ‘पण शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय आणि त्याची रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची पद्धत लक्षात घेता, मला वाटते की तो पुढच्या टेस्ट पर्यंत खेळू इच्छित होता. गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी पाहता, त्याला बीसीसीआय आणि निवड समितीकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाला नाही, ज्याची त्याला अपेक्षा होती’.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here