सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी लिहिलेल्या,”संघर्षमय जीवन गाथा” या पुस्तकासह सर्वहारा पदवीदान सोहळा,बंधुत्व प्रतिष्ठानचे पुरस्कार,मानपत्र असे नानाविध कार्यक्रमांचे वितरण रविवार दि.२५ रोजी सकाळी १०।। वा.होणार आहे.
शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी ११ वा. अनिल वीर यांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक ज्येष्ट नागरिक संघातर्फे मानपत्र देण्यात येणार आहे.अशी माहिती अध्यक्ष शामराव बनसोडे व सरचिटणीस बी.एल.माने यांनी दिली.शनिवार दि.२४ रोजी वृक्षारोपण व पालातील गरिबांना कपडे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
रविवार दि.१०।। वा. अभिष्टचिंतनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख कार्यक्रम होणार आहे.बंधुत्व प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.ज्येष्ट नेते गणेश कारंडे आणि मित्र परिवार यांच्यावतीने अनिल वीर यांना सर्वहारा पदवी प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. महायोद्धा व बंधुत्व या पुस्तिकेसह ‘संघर्षमय जीवन गाथा” या पुस्तक प्रकाशनाचा अंतिम सोहळा होणार असून त्यावर निवडक मान्यवर भाष्य करणार आहेत. तेव्हा सर्वांनी वेळेवर उपस्थीत रहावे.असे आवाहन सुवर्णमहोत्सवी गौरव समितीने केले आहे.