[ad_1]
Rohit Sharma : भारताच्या वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सन्मानित करण्यात आलं. ज्या स्टेडियमवर खेळून रोहितने आपल्या करिअरची सुरुवात केली त्याच स्टेडियमवरील एका स्टॅन्डला रोहित शर्माचं नाव देण्यात आलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडेवर आयोजित करण्यात आलेल्या उदघाटन कार्यक्रमाला रोहित सह कुटुंब पोहोचला होता. यावेळी त्याचे आईवडील, भाऊ वाहिनी, पत्नी इत्यादी उपस्थित होते. मात्र कार्यक्रमानंतर स्टेडियमबाहेर पडताना रोहित शर्माचा अँग्री ब्रदर अंदाज सर्वांनी पाहिला. कारवरील डेंट पाहून रोहितने आपल्या लहान भावाला झापलं.
नेमकं काय घडलं?
वानखेडेवरील रोहित शर्माच्या स्टॅन्डचं उदघाटन रोहितच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आलं. याक्षणी त्याचं सर्व कुटुंब हे भावुक झालं होतं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कार्यक्रम संपल्यावर मुंबई इंडियन्सच्या टीम सोबत रोहितला सराव सुरु करायला होता, यासाठी तो आपल्या कुटुंबाला गाडीजवळ सोडायला गेला. त्यावेळी त्यानं पाहिलं की त्याचा कारच्या मागच्या बाजूला डेंट पडला होता. कारवरील डेंट पाहून त्याने मजेशीर अंदाजात लहान भाऊ विशालला विचारलं, ‘हे काय आहे?’ यावेळी विशालने त्याला सांगितले की, ‘पार्किंग करताना रिवर्स घेत्यावेळी कारच्या मागच्या बाजूस डेंट आला आहे’. मग रोहितने विचारलं, ‘कोणामुळे, तुझ्यामुळे का?’ यावर लहान भावाने होकारार्थी उत्तर दिल्यावर, रोहित भडकला आणि तो म्हणाला ,’डोकं कुठे असतं तुझं?’. रोहित शर्मा हा कार लव्हर असून त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ :
स्टॅन्डच उद्घाटन झाल्यावर काय म्हणाला रोहित?
स्टँडच्या उद्घाटनानंतर, रोहित शर्माने चाहत्यांसोबत त्याच्या मनातील भावना शेअर केल्या. रोहित म्हणाला की, ‘मी कधीच कल्पना केली नव्हती की वानखेडेसारख्या ऐतिहासिक मैदानावर माझ्या नावाने स्टँड असेल. मी इथे अनेक अविस्मरणीय क्षण घालवले आहेत. आज माझे आई-वडील, भाऊ आणि पत्नी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी हे काहीच करू शकलो नसतो’. रोहितने पुढे सांगितलं की, ‘मुंबई इंडियन्सचे सामने आणि सरावसत्रे हे याच मैदानावर होतात. त्यामुळे हा स्टँड माझ्यासाठी अधिक जवळचा आणि खास आहे’.
रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकला वर्ल्ड कप 2024 :
गेल्या काही वर्षांत रोहित शर्माने भारतीय संघाला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून दिलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे. रोहितने सध्या टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे.
[ad_2]