IPL च्या इतिहासातील तिसरं सर्वात वेगवान शतक, दिल्लीच्या मैदानात चौकार षटकारांचा पाऊस

0

[ad_1]

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये 68  वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांनी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर तुफान फटकेबाजी करून तब्बल 278 धावांचा स्कोअर उभा केला. हा स्कोअर आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वाधिक स्कोअर होता. तर यात फलंदाजी करताना हैद्राबादचा विकेटकिपर फलंदाज हेन्रीचं क्लासेन याने अवघ्या 37 बॉलमध्ये शतक ठोकण्याची कामगिरी केली. त्याचं हे शतक आयपीएलच्या इतिहासातील तिसरं सर्वात वेगवान शतक होतं. 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादकडून अभिषेक शर्माने 32, ट्रेव्हिस हेडने 76, ईशान किशनने 29, अनिकेत वर्माने 12 तर हेन्रीचं क्लासेनने 105 धावांची कामगिरी केली. क्लासेनने 39 बॉलमध्ये 105 धावा केल्या. या दरम्यान त्याने 7 चौकार आणि 9 षटकार लगावले. हेन्रीचं क्लासेनने मारलेलं हे शतक आयपीएलच्या इतिहासातील तिसरं सर्वात वेगवान शतक ठरलं. त्याने युसूफ पंथांच्या रेकॉडची बरोबरी केली असून 2010 मध्ये राजस्थानकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 बॉलमध्ये त्याने शतक ठोकलं होतं. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे. 2013 मध्ये त्याने 30 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. तर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मधेच 35 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. 

हेही वाचा : एम एस धोनीचं निवृत्तीबाबत मोठं विधान, गुजरातला पराभूत केल्यावर स्पष्टच बोलला

 

सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 279 धावंच आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात कोलकाता नाईट रायडर्स अपयशी ठरले. सनरायजर्स हैदराबादचा आयपीएल 2025 मधील हा शेवटचा सामना होता, यात विजय मिळवण्यात त्यांना यश आले. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ यापूर्वीच प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडले आहेत. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स हा विजेता तर सनरायजर्स हैदराबाद संघ हा उपविजेता ठरला होता. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here