[ad_1]
Rohit Sharma: रोहित शर्माने आयपीएल 2025 मध्ये आपल्या बॅटींगने चांगली कामगिरी केलीय. रोहितने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 305 धावा केल्यायत. ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापेक्षा जास्त धावा फक्त रायन रिकेल्टन (361) आणि सूर्य कुमार यादव (583) यांनी केल्या आहेत. आज जयपूरमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध होणाऱ्या आयपीएल 2025 च्या 69 व्या सामन्यात रोहित शर्मा आता मैदानात उतरेल तेव्हा त्याच्या नजरेसमोर एक मोठा विक्रम असेल.
रोहित 7000 धावांच्या जवळ
रोहित शर्मा आयपीएलमध्ये एक मोठा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. जर रोहितने पंजाब किंग्जविरुद्ध 67 धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरेल. आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाला आयपीएलमध्ये 7000 धावांचा टप्पा ओलांडता आलाय आणि त्या फलंदाजाचे नाव विराट कोहली आहे.
विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 8000 हून अधिक धावा केल्यायत. यानंतर हिटमन दुसऱ्या स्थानावर आहे. जो 7000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केल्याने त्याला हा आकडा गाठण्याची उत्तम संधी आहे. रोहित शर्मानंतर शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण धवनने व्यावसायिक क्रिकेटला अलविदा केलंय.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
विराट कोहली – 8552
रोहित शर्मा – 6933
शिखर धवन – 6769
डेव्हिड वॉर्नर – 6565
सुरेश रैना – 5528
एमएस धोनी – 5439
300 षटकार मारण्याच्या जवळ
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज आहे. रोहित आयपीएलमध्ये 300 षटकारांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 3 सिक्सर दूर आहे. आजच्या सामन्यात त्याला हा खास टप्पा गाठण्याची उत्तम संधी असेल. पंजाबविरुद्ध त्याने 3 षटकार मारताच तो आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा ख्रिस गेलनंतर जगातील दुसरा फलंदाज बनेल. गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर 357 षटकारांची नोंद आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
ख्रिस गेल – 357
रोहित शर्मा – 297
विराट कोहली – 291
एमएस धोनी – 264
एबी डिव्हिलियर्स – 251
डेव्हिड वॉर्नर – 236
[ad_2]