ipl 2025 qualifier 1 rcb vs pbks punjab kings allout on 101 runs againts rcb bowling attack

0

[ad_1]

IPL 2025 : आयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 सामना गुरुवार 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings VS Royal Chellengers Bengluru) यांच्यात खेळवला जात आहे. महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना पार पडत असून यातील विजेता थेट फायनलचं तिकीट मिळवले. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आणि गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करून पंजाब किंग्सला केवळ 101 धावांवर ऑल आउट केले. 

महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या कर्णधारांमध्ये सामन्यापूर्वी टॉस झाला. हा टॉस आरसीबीने जिंकून गोलंदाजी निवडली तर पंजाबला प्रथमी फलंदाजीचे आव्हान दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सच्या एकही फलंदाजाला फारकाळ मैदानात टिकू दिले नाही. पंजाबकडून सर्वाधिक धावा प्रभसिमरन सिंह (18), मार्कस स्टोनिस (26) आणि अझमतुल्लाह उमरझाई (18) यांनी केल्या. तर उर्वरित फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही. 

हेही वाचा : पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटरचे कापण्यात आले दोन्ही पाय, कारण ऐकून धक्का बसेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांपैकी पंजाबच्या सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट सुयश शर्मा आणि जॉश हेजलहूडने घेतल्या. यश दयालने 2 आणि भुवनेश्वर कुमार तसेच रोमॅरियो शेफर्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सला 14.1 ओव्हरमध्ये 101 धावांवर ऑल आउट केले. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 102 धावांचे आव्हान मिळाले आहे. 

 

पंजाब किंग्स प्लेईंग 11 :

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, काइल जेमिसन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेईंग 11 :

विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड, सुयश शर्मा



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here