[ad_1]
Heinrich Klaasen : 2 जून रोजी ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता क्रिकेट विश्वातील अजून एका दिग्गज क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेटकिपर फलंदाज हेनरिक क्लासेनने वयाच्या 33 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.
सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून हेनरिक क्लासेनने त्याच्या निवृत्तीबाबत फॅन्सना सांगितले. हेनरिक क्लासेनने काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना शतक ठोकलं होतं, मात्र लीग स्टेजमधील अनेक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने ते प्लेआफसाठी क्वालिफाय होऊ शकले नाहीत.
हेनरिक क्लासेनने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करून आपल्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मोठा सन्मान मिळाला याबद्दल आभार मानले. देशासाठी क्रिकेट खेळणं हे आपलं लहानपणीपासूनच स्वप्न होतं असं हेनरिक क्लासेन म्हणाला. हेनरिक क्लासेन त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला की, ‘ हा माझ्यासाठी एक दुःखद दिवस आहे कारण मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. मला या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागला. हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता, पण एक असा निर्णय आहे ज्याने माझ्या मनाला शांतता मिळाली’.
हेही वाचा : Glenn Maxwell retirement: ग्लेन मॅक्सवेलने घेतली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, कारण…
क्लासेनने पोस्टच्या शेवटी म्हटले की, ‘प्रोटियाज बॅजला आपल्या छातीवर लावून खेळणं माझ्या करिअरमधील खूप मोठा सन्मान होता आणि नेहमी राहील. मी आता माझ्या कूटूंबासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी उत्सुक आहे. मी त्या सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांनी माझ्या करिअरमध्ये मला आणि माझ्या सहकार्यांना समर्थन दिलं’.
हेनरिक क्लासेनचं करिअर :
हेनरिक क्लासेन हा एक आक्रमक फलंदाज आणि विकेटकिपर असून त्याने साऊथ आफ्रिकेसाठी तीनही फॉरमॅट खेळले आहेत. त्याने एकूण 102 सामने खेळले असून यात 4 टेस्ट, 60 वनडे आणि 58 टी20 सामन्यांचा समावेश आहे. तसेच वनडेमध्ये त्याने 4 शतक सुद्धा लगावली आहेत. 2018 मध्ये पदार्पण केल्यावर त्याने 3145 धावा केल्या.
[ad_2]