आज शोकसभेचे आयोजन
सातारा : भीमनगर, ता. महाबळेश्वर या गावचे सुपुत्र अनिल गणपत भालेराव (प्राथमिक शिक्षक) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सून व अविवाहित दोन मुली आहेत . नुकतेच त्यांच्या मुलाचे लग्न झाले असून एक मुलगी सरपंच असून सध्या ती नवोदय विद्यालयात नोकरीस आहे. त्यांनी सर्व मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण दिलेले आहे. काविळाच्या आजारावर ते वाईत उपचार घेत होते.राहत्या घरी सकाळी अंघोळीला जाताना खाली निपचित पडले. त्यातच त्यांचा अंत झाला.याबद्धल त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विविध क्षेत्रातील मान्यवर,शिक्षक, संघटना, धम्मबांधव ग्रुप व विविध माध्यमाद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. पुण्यानुमोदन व शोकसभेचा शनिवार दि.२२ रोजी सकाळी ११ वा.राहत्या घरी येथे आयोजीत करण्यात आला असून एकनाथ भालेराव अध्यक्षस्थान भूषावणार आहेत.