माहूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ; तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण

0
फोटो : माहूर तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करताना तहसीलदार किशोर यादव तर नगरपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करताना नगराध्यक्ष फिरोज दोसानी (छायाचित्र: बालाजी कोंडे)

माहूर : माहूर येथे आज एक मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालयासह मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
                      माहूर नगरपंचायत कार्यालय येथे सकाळी साडे सात वाजता नगराध्यक्ष फिरोज दोसांनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, सभापती विजय कामटकर, रणधीर पाटील, नगरसेविका नंदा रमेश कांबळे, नगरसेविका शकीला बी शेख शब्बीर, नगरसेविका सागर विक्रम राठोड, राजू सौंदलकर, निरधारी जाधव, सहाय्यक अधीक्षक सुनील वाघ,देविदास सिडाम,विजय शिंदे, सुरेंद्र पांडे, शेख मजहर, विशाल ढोरे, गणेश जाधव, भाग्यश्री रासवते उपस्थित होते.
                      सकाळी आठ वाजून पाच मिनिटाला तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायनात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार,पोलीस निरीक्षक नितीन काशीकर,श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी,भाजपाचे सरचिटणीस अनिल वाघमारे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे मनोज कीर्तने, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय आमले, गजानन भारती,अविनाश टनमने, दत्तात्रय शेरेकर,राजू दराडे, प्रभू पानोडे, शारदासूत खामनकर यांच्यासह तलाठी,मंडळ अधिकारी,कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच माहूर गडावरील रामगड किल्ल्यातील महाकाली बुरुजावर नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here