सातारा : त्रिपुडी,ता.पाटण येथील अष्टशील प्रतिष्ठानचे आधारस्तंभ लोकजीत तथा भिकाजी दादू वीर (तात्या) यांचे अल्पशा आजाराने कराड येथे उपचार घेत असतानाच ६६ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे व नातेवाईक असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्रिपुडी या गावीच अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.