सातारा/अनिल वीर : येथील विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने सोमवार दि.१५ रोजी सकाळी ११ वाजता जंतर-मंतर नवी दील्ली येथील महीला पैलवान यांच्या धरणा आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने/धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाची शान वाढवणारे खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावुन खेळतात. त्यावेळी देशातील जनता त्यांचे कौतूकही करतात. परंतू त्याच खेळाडूंच्यावर त्याच क्षेत्रातील प्रस्थापित यंत्रणेतील व केंद्र सरकारमधील लोक सत्तेचा गैरवापर करून अन्याय करत असतील तर त्यास वाचा फोडण्यासाठी व न्याय मागण्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर हा फक्त त्या खेळाडूंचाच विषय रहात नाही. सर्वसामान्य महीलांना न्याय कोण देणार ? या गंभीर विषयात आता जनतेने खेेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे.तेव्हा त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले पाहीजे. याचाच भाग म्हणून विवीध संघटनांच्यावतीने निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. तरी विवीध संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन संयोजकातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले आहे.