म्हैसगाव येथिल खाजगी सावकार गजाआड
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे :
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या खाजगी सावकाराच्या घरावर सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याच्या पथकाने छापा टाकून घर झडतीत अनेक महत्वाची कागदपञे व कोरे धनादेश सापडले असुन हि सर्व कागदपञे जप्त करून त्याची चौकशी करण्यात आली.कागदपञाच्या आधारावरुन अवैध खाजगी सावकाराविरोधात राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. खाजगी सावकाराला गजाआड करण्यात आले आहे.राहुरी तालुक्यात प्रथमच बेकायदेशीर सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरीतील सहाय्यक सहकार विभागाचे अधिकारी मुदिन शेख यांच्या फिर्यादीवरून भास्कर राजाराम बेलकर (वय ५५, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) या बेकायदेशीर खाजगी सावकारावर राहुरी पोलिस ठाण्यात खाजगी सावकार अधिनियमानुसार गुन्हा दाखल होणार आहे.
याबाबत सविस्तर असे म्हैसगाव येथील शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून लाखो रुपयाची रक्कम व्याजाने घेतलेली होती. त्यांनंतर संबंधित शेतकऱ्यांनी सावकाराला मुद्दल व व्याजासह रक्कम परतावा केली होती. खाजगी सावकाराकडून अवासव्वा रक्कम वसुल करीत आसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेऊन राहरी येथील सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याच्या पथकाने दि. ९ मे २०२३ रोजी म्हैसगाव येथील खाजगी सावकाराच्या घरावर छापा टाकला. यावेळी सहाय्यक निबंधक यांना खाजगी सावकाराच्या घरात २३ चेक, १४ कोरे व लिखित स्टॅम्प पेपर, गाड्या संदर्भात दोन कागदपत्रे (बोलेरो व दुचाकी), हस्तलिखित रकमेची नोंद असलेले आखीव आठ कागदपत्रे, १०७ पेजेस वहीमध्ये ज्या लोकांना व्याजाने रक्कम दिली आहे अशांची नावे, रक्कम व तारीख असलेली वही, तीन खरेदी खत व उसनवार खरेदी पावत्या आढळून आल्या होत्या. या व्यतिरिक्तही अजूनही गौडबंगाल असलेचेही नागरिकांतून बोलले जात आहे.
खाजगी सावकारावर प्रशासनाने छापा टाकूनही त्वरित कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना, प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारदार भीतीच्या सावटाखाली वावरत होते. तर त्यांना अनेकांकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकारही झाला. सावकार वेगवेगळ्या प्रकारे मध्यस्थीच्या माध्यमातून प्रकरण रफादफा कारण्याबाबतही हालचाली सुरू होत्या. अशा एकनाअनेक घटना पाच दिवसात घडल्या असल्याचे तक्रारदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
म्हैसगावातील ‘त्या’ तरुण शेतकऱ्यांनी दीड लाख, दोन लाख, तीन लाख व काही हजारो रुपये रक्कम व्याजाने घेतलेली होती व ती रक्कम मुद्दल व व्याजासह पाच-पाच, सात-सात लाख रुपये एवढी खाजगी सावकाराला परतावा केली असूनही सावकार पुन्हा पुन्हा पैशाची मागणी करत होता. तसेच या तरुणांना त्याच्या खाजगी वाहनाने जात असताना आडवून जीवे मारण्याची भाषा व धमकी देत होता. एवढेच नव्हे तर, संबंधित शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराला त्याच्या रकमेची मुद्दल दिली असता त्याच्याकडे ठेवलेले चेक व स्टॅम्प पेपर पुन्हा देण्याची मागणी केली. परंतु चेक व स्टॅम्प पेपर गहाळ झाले असल्याचे सावकाराने सांगितले व ते कागदपत्रेही पुन्हा दिलेले नाहीत. याउलट, तरुण शेतकऱ्यांची पत्नी, आई, वडील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही देवून संबंधित सावकाराने दहशत निर्माण केलेली होती. म्हैसगावातील बेकायदेशीर खाजगी सावकाराकडून तरुण शेतकऱ्यांना वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून सावकाराविरोधात प्रशासनाकडे कारवाईबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार खाजगी सावकाराविरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने चारही तरुण शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून काही अंशी दिलासा मिळालेला आहे.
म्हैसगावातील आणखी २ तसेच राहुरीतील १० सावकार, देवळाली प्रवरातील ५ सावकार प्रशासनाच्या रडारवर आहेत.?राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस खाजगी सावकारांचे पेव वाढत चाललेले आहेत. अनेक नागरिक व शेतकरी सावकाराच्या जाचाला बळी पडत आहे. लवकरच म्हैसगाव येथील दोन सावकार व राहुरी शहरातील दहा सावकार तर देवळाली प्रवरातील ५ सावकार सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याच्या रडारवर असून लवकरच कायदेशीर कारवाई खाजगी सावकाराचा केली जाणार आहे.
म्हैसगाव येथील खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहय्यक सहकार विभागातील अधिकारी मुदिन शेख यांच्या फिर्यादिवरुन खाजगी सावकारीचा राहुरी पोलीस ठाण्यात प्रथमच दाखल करण्यात आला आहे.
मुद्दल व व्याज देऊनही वारंवार जास्तीची रक्कम मिळावी, यासाठी चारही शेतकऱ्यांना तगादा करत होता. मात्र त्या चारही शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराच्या कारनाम्याचा पर्दाफाश करून त्याचे बिंग फोडले व सहाय्यक निबंधकांसह जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारीचा पाढा वाचला.
—————————–++—————–
चौकट
नागरिकांनी स्वतः हुन पुढे आले पाहिजे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खाजगी सावकार एखाद्या व्यक्तीला सावकारकीच्या माध्यमातून दमबाजी करत असेल तर राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्याशी संपर्क करावा असे त्यांनी वृत्तपञ प्रतिनिधी यांना स्वतःहा सांगितले आहे.
चौकट
पोलीसच करतात खाजगी सावकारांना सावधान !?
देवळाली प्रवरा शहरातील एका तरुणाने खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळुन जावून घरातुन पळुन जावुन रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी रेल्वेची वाट पाहत बसला होता.त्याचा शोध घेताना तो रेल्वे रुळावर सापडला. देवळाली प्रवरा पोलीस चौकीत हा तरुण हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.तो सापडल्या नंतर पोलीसांनी जाब जबाब घेताना खाजगी सावकारकीचा प्रकार उघडकीस आला. त्याच वेळी सावकारांच्या नाव मोबाईल नंबरसह लेखी तक्रार देवळाली प्रवरा पोलीस चौकीत देण्यात आली होती.परंतू त्या सावकारांना पोलीस ठाण्यात बोलावुन चौकशी करण्याची तसदी पोलीसांनी घेतली नाही.उलट सावकारांना सावध करुण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड करण्यात आल्याची चर्चा आहे.खाजगी सावकाराच्या ओल्या पार्टीला पोलीसांबरोबर अधिकारीही हजेरी लावत असल्याने खाजगी सावकार आमच्यावर कोणीच कारवाई करु शकत नाही.असे चार चौघात खाजगी सावकार बोलत असतात.