सातारा/अनिल वीर : आंतर राष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था व भारत स्काऊट गाईड कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन फेरी काढण्यात येणार आहे.
सकाळी 9.30 वा.येथील राजवाडा (छ.प्रतापसिंह हायस्कूल) येथून फेरी सुरू होणार आहे. ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथपर्यंत आहे.तेव्हा नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.