बारामती: वाघळवाडी तालुका बारामती येथील ओंकार दत्तात्रय हेगडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली , पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव तसेच कमिटीतील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार आयोजीत करण्यात आला. यावेळी मानव अधिकार संरक्षण समिती अध्यक्ष नागेश जाधव , सचिव सोमेश हेगडे साहेब ,प्रसिद्धी प्रमुख विनोद गोलांडे ,संघटक,शिवाजीराव काकडे , सचिव भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका सुशील कुमार अडागळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष धुमाळ त्यावेळी उपस्थित होते . यावेळी बोलताना ओंकार याने प्रतिकूल परिस्थितीतून आपले ध्येय निश्चिती करून यश साध्य करण्यासाठी कसे परिश्रम घेतले याबद्दल आपले मत व्यक्त केले .त्याचबरोबर पुढील काळामध्ये मी माझी सेवा प्रामाणिकपणे व योग्य पद्धतीने करेन असे त्यांनी सांगितले. या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे .असेही मत मत व्यक्त केले.मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव यांनी ओंकारच्या यशाबद्दल बोलताना ओंकारच्या यशाने ग्रामीण नवयुवकांना एक प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले.