जालना ,सुदाम गाडेकर :
जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आर बी एस के /डीई आय सी च्या माध्यमातून मोफत टू डी इ को तपासणी शिबिर डी इ आय सी विभागात दिनांक8/7/ 2023 रोजी संपन्न झाले. 0 ते 18 वर्ष वयोगटातील लहान बालकांचे मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरा करिता मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ. भूषण चव्हाण पेडिया ट्री क कार्डिओलॉजिस्ट तसेच प्रदीप मिश्रा व संपूर्ण टीम यांनी बालकांची तपासणी केली. या शिबिरामध्ये एकूण 63 बालकांची थोडी इको तपासणी करण्यात आली त्यापैकी ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे आढळून आले त्या बालकांवर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. टू डी को शिबिर हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अर्चना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले . जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. भोसले यांनी शिबिराचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना आरबीएसके व डीई आयसी विभागाची माहिती दिली व सर्वसामान्य लहान मुलांना होणारा फायदा समजावून सांगितला. आरबीएसके/ डी आय सी हे मुख्यतः 4 डी वर काम करतात हे 4d म्हणजे डिसीज ,डिसॅबिलिटी, डेव्हलपमेंटल दिले, डिफिशियन्सी या आजार व विकाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांना मार्गदर्शन व पुढील उपचार केले जातात तसेच जे उपचार जिल्हा रुग्णालयामध्ये शक्य नाहीत त्या मुलांना पुढील उपचाराकरिता संदर्भ सेवा व मार्गदर्शन दिले जाते. तरी जास्तीत जास्त बालकांनी व पालकांनी या सुविधांचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भोसले मॅडम यांनी केले .
या शिबिराकरिता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मंगला मुळे, डॉ नितीन शहा, डॉ सुरजित आंबोरे हे उपस्थित होते डॉ संजय मेश्रा
डॉ संजय मेश्राम बाह्य संपर्क वैद्यकीय ,अधिकारी डॉ प्रताप घोडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . शिबिर यशस्वी करण्याकरिता सर्व आरबीएसके/ डीआयसी स्टाफ यांनी परिश्रम घेतले. डॉ मीनल देवले डी आय सी मॅनेजर, डॉ विजय राठोड, श्रीमती विद्या मस्के, डॉ क्स्मिता पोकळे, डॉ अनिल पोकळे, डॉ जया बुरा, डॉ सचिन आंबा डकर, डॉ दहिवाल ,डॉअवचार ,डॉ स्मिता पतंगे डॉ सोनिया बोंधारे, डॉ पूनम अग्रवाल. संदीप रगडे, बबलू पठाण ,दीपक जाधव ,डॉ अंकुश डोंगरे ,डॉ कदम ममता ढाले ,अनिता नागे ,सुमित्रा काकडे ,अश्विनी लहाने ,वर्षा गवळी लक्ष्मी पाईकराव, कीर्ती असोलकर, सीमा गवळी, रक्षा घुगे ,संदीप गवारे प्रज्ञा शिरसाट ,डॉ गजानन खरात डॉ अमित जयस्वाल ,अरुण सुर्वे ,आनंद कंकाळ .यांनी प्रयत्न केले