🎤परीपाठ 📜 सौ सविता देशमुख, उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता – सिन्नर मो . .9970860087
_*❂ 📆दिनांक :~ 22 जुलै 2023 ❂*_
❂🎴 वार ~ शनिवार 🎴❂
_*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आषाढ. २२ जुलै
तिथी : शु. चतुर्थी (शनी)
नक्षत्र : पू. फाल्गुनी,
योग :- वरियन
करण : बव
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 07:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💡यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ.
🔍अर्थ:–
एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होत असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
🌞या वर्षातील🌞 203 वा दिवस आहे.
_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_
👉१९०८ : ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा
👉१९३१ : फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे ‘हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.
👉१९३३ : विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
👉१९९९: आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने समान कामांसाठी समान वेतन ही योजना लागू केली.
👉२००१ : जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.
👉२००३: अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची मुले मारली गेली.
👉२०१२: भारताच्या राष्ट्रपती पदावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकरणी, प्रणव मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली.
_*💐जन्मदिवस / जयंती💐*_
👉१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.
👉१८९८: पं. विनायकराव पटवर्धन – भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्यातील गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)
👉१९२३ : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)
👉१९२५ : गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक. भारत सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कर सन्मानित महाराष्ट्रीयन प्रतिष्ठित पत्रकार, इंग्रजी वृत्तपत्र महाराष्ट्र टाईम्सचे दिग्गज संपादक, इतिहासकार, अभ्यासक, समाजसुधारक व लेखक
👉१९६५: रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते व आशा संस्थेचे एक संस्थापक व सदस्य संदीप पांडे यांचा जन्मदिन.
👉१९७०: महाराष्ट्राचे राजकारणी, देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.
_*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_
👉१५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.
👉१८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.
👉१९१८ : इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)
👉१९४८: स्वातंत्र्य पूर्व भारतातील प्रसिद्ध भारतीय चित्रकार हेमेंद्रनाथ मजूमदार यांचे निधन.
👉१९८४ : गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – उत्कृष्ट मराठी कथा लेखक, साहित्यिक व प्रकाशक (जन्म: ? ? १९०९)
👉१९८७: माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू ए. जी. क्रिपाल सिंह यांचे निधन.
👉१९९५ : हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉बीजिंग हे शहर कोणत्या देशातील आहे?
🥇चीन
👉श्वेत क्रांतीचा संबंध कशाशी संबधित आहे?
🥇दूध उत्पादन
👉पृथ्वीवर किती खंड व किती महासागर आहे?
🥇७ खंड व ४ महासागर
👉मानवजातीला मिळालेले सर्वश्रेष्ठ असे वरदान कोणते आहे?
🥇भाषा
👉लोकमान्य टिळकांची जयंती केव्हा असते?
🥇२३ जुलै
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻
घमेंडी चित्ता🐆
जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला,” तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील.” चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, ” हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू.” हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, ” अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल !
🧠तात्पर्य – जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸